💥पुण्यस्मरण निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात बोलत ते होते💥
जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर
जिंतूर मागील काही वर्षापासून दहावी बारावीचे निकाल पाहिले तर मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेऊन विद्यार्थी पास होत आहेत परंतु सध्याचे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान झाले आहे. या शिक्षणाला व्यवहारीकतेची जोड देऊन उद्योग व्यवसाय करण्याचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले ते दि. २५ जून रोजी पुण्यस्मरण निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात बोलत ते होते.
जिंतूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगरात उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांवळे यांचे वडील कै. गोपाळराव भांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायंकाळी झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमास माजी आमदार विजय भांबळे, अजय चौधरी, प्रल्हाद भांबळे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे हे उपस्थित होते. यावेळी आपल्या खास शैलीत इंदुरीकर महाराजांनी शहरातील नागरिकांचे प्रबोधन केले. यावेळी बोलताना पुढे म्हणाले की सामाजिक जीवनात माणसाने आपली नीतिमूल्ये जपली पाहिजे माणसाने समाधानी आयुष्य जगले पाहिजे जिवन जगताना आपण समाजाचे काही देणे लागतो हा हेतू ठेऊन मरणोत्तर देहदान नेत्रदान केले पाहिजे घरातील एखादा व्यक्ती मरण पावल्यास रक्षा इतर ठिकाणी विसर्जित करण्यापेक्षा त्या जागेवर आठणीसाठी एखादे झाड लावले पाहिजे असे इंदुरीकर महाराजांनी आव्हान केले.
यावेळी त्यांनी सध्या चालू असलेल्या घडामोडी उदाहरणे देऊन आपल्या विनोदी शैलीतून श्रोत्याना खळखळून हसवत प्रबोधन केले या कार्यक्रमास तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांनी हजेरी लावलेली किर्तनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब काजळे, पिंटू डोंबे, राहुल सागरे, आदीने प्रयत्न केले....
0 टिप्पण्या