💥यावेळी सरपंच अनिरुद्ध चव्हाण,मा.पं.स.उपसभापती अनवरपाशा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
चारठाणा येथिल रोज मजुरी करुन उदरनिर्वाह करणार्या कुटुंबातील दोन विद्यार्थांना 10 वी 12 वी मध्ये प्रथम श्रेणीत गुण संपादन करुन आपले व कुठुंबाचे नावलौकीक मीळवले या विद्यार्थ्यांचा नानासाहेब राऊत यांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
या बाबत माहीती अशी की चारठाणा येथिल रोज मजुरी करुन कुठुंबाचा गाडा चालवणारे शे.आलिमोदीन यांचा मोठा मुलगा शे. शाहेद शे. आलिमोदीन याने चारठाणा येथिल संत जनार्दन महाविद्यालयात 12 वी मध्ये 71% गुण संपादीत केले तर लहान मुलगा शे. अमेर शे. आलिमोदीन याने तुराबुल हक उर्दू शाळेतुन 10 वी मध्ये 91% गुण घेऊन विद्यार्थ्यातुन प्रथम येण्याचा मान मिळवला या नावलौकीक करणार्या विद्यार्थ्यांनी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बोलुन दाखवले त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा ओ. बी.सी नेते नानासाहेब राऊत यांनी सत्कार केला या वेळी शुर्खुम्याचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते या वेळी सरपंच अनिरुद्ध चव्हाण,मा.प.स.उपसभापती आनवरपाशा देशमुख,मा.पं.स.सदस्य कासीम कुरेशी,ग्रां. प. सदस्य बद्रुद्दीन काझी, नानासाहेब निकाळजे, शिवशंकर तमशेट्टे, स. रहेमत अली, सलाम इनामदार, मा. उपसरपंच तहेसिन देशमुख, एकबालोद्दीन काझी, कासिम इनामदार, स. करिमभाई,पत्रकार आबेद देशमुख, समियोद्दीन काझी, मुजीब देशमुख,नैमोद्दीन काझी, सुधाकर क्षीरसागर, हापेज ईनामदार, मुन्सी काझी, शे. आसेफ, स. दाउद अली, इब्राहिम पठाण, आल्ताफ पठाण, प्रभाकर कुर्हे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.....
0 टिप्पण्या