💥हवामान बदलानुसार वसुंधरा संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक - आमदार सौ.नमिताताई मुंदडा


💥कृषि महाविद्यालयात 'माझी वसुंधरा अभियानाचा' समारोप💥


ताडकळस प्रतिनिधी 

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष संवर्धन व स्वच्छता मोहीम आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांनी येथे केले. येथील कृषि महाविद्यालयात सोमवार, दिनांक 13 जून 2022 रोजी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहाची सांगता झाली यावेळी त्या बोलत होत्या. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहाची सांगता करण्यात आली.


या समारोहाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे होते तर सेवानिवृत्त कुलसचिव डॉ.दिगंबर चव्हाण, डॉ.रवि चव्हाण, कविराज कचरे, डॉ.मोहन धुप्पे, डॉ.रवींद्र चव्हाण, डॉ.दीपक लोखंडे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.  आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांनी कृषी स्नातकांना पर्यावरण संवर्धन व स्वच्छता मोहीम या कार्यक्रमात नियमित सहभागी होण्याचे आवाहन करून यातून आपल्या दैनंदिन जीवनात शिस्त अंगीकारण्याचा सल्ला दिला पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कृषिच्या विद्यार्थ्यांनी हवामान बदलात टिकून राहणारे कृषि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन संशोधन करावे व शेतकरी पशुपालकांना मदत करावी, जेणे करून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देऊन योगा पार्क ऑक्सिजन हब निर्मितीमुळे अंबानगरीच्या वैभवात भर पडल्याचे प्रतिपादन केले. यावेळी निवृत्त कुलसचिव डॉ.दिगंबर चव्हाण, कविराज कचरे यांचे समयोचित मार्गदर्शन झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नरेशकुमार जायेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.योगेश वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.सुहास जाधव, डॉ.विद्या तायडे, प्रा.वैभव कांबळे, डॉ.धीरज पाथ्रीकर, अनंत मुंडे, अनिल खेडेकर, बाळासाहेब चिल्लरगे, यादव पाटील, स्वप्नील शेलार, बाबासाहेब वारकरी यांनी विशेष परिश्रम घेतले...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या