💥हरियाणा राज्यातील पंचकुला येथे झाली 'खेलो इंडिया' राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा💥
परभणी - हरियाणा राज्यातील पंचकुला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील " खेलो इंडिया " युथ गेम्स मध्ये पहिल्यांदाच समावेश झालेल्या "गतका "प्रकारात परभणी मधील पाच मुलींनी पदकं प्राप्त करून परभणी ची शान वाढवली आहे.गतका (सोटी-फरी सांघिक) या क्रिडा प्रकारात एक कास्य पदक प्राप्त झाले आहे, यामध्ये शुभांगी अंभुरे, जान्हवी खिस्ते, नंदिनी पारधे,सिमा खिस्ते या परभणी च्या मुलींनी हे पदक पटकावले आहे, तसेच सिंगल स्टिक या क्रिडा प्रकारात विजया लक्ष्मी पिंपरीकर हिने कास्य पदक प्राप्त केले आहे, या सर्व खेळाडूंना मास्टर पांडुरंग अंभुरे या परभणीच्याच ' कोच ' नी प्रशिक्षण दिले आहे ही परभणीकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
पदकासह, विजयश्री प्राप्त करून वरील सर्व खेळाडूंचे दि.१० जुनं २०२२ रोजी सकाळी ७-०० वाजता परभणी च्या रेल्वे स्टेशन वर आगमन होत आहे, त्यांच्या स्वागतासाठी परभणीवासिंयाबरोबरच, जिल्ह्यातील क्रिडा प्रेमी जनतेने तसेच मास्टर पांडुरंग अंभुरे यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील हितचिंतक, मित्र परिवार तसेच पत्रकार मित्रांनी परभणी रेल्वे स्टेशन वर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या