💥पोलिसांनी जपली माणुसकी ; जखमी महिलेस खांद्यावरून रुग्णालयात पोहोचवून वाचविला जीव....!


💥वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौजे वाघी खुर्द शेतशिवारातील घटना💥

फुलचंद भगत

वाशिम :- जिल्हा पोलीस दल महिलांच्या सुरक्षिततेसाठी व महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी सदैव कार्यतत्पर आहे. याचा प्रत्यय पो.स्टे.शिरपूर हद्दीतील मौजे वाघी खुर्द शेतशिवारात घडलेल्या घटनेवरून येतो. 

                शेतीच्या व घरगुती वादाच्या जुन्या कारणावरून सोनुबाई खरात यांना त्या शेतात काडीकचरा वेचण्यासाठी गेल्या असता त्यांचे पती व इतर नातेवाईक असे एकूण ०८ जणांनी त्यांच्यावर कोयत्याने व स्प्रिंकलरच्या लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.सोनुबाई खरात या गंभीर जखमी होऊन बेशुद्धावस्थेत शेतात पडलेल्या असतांना त्यांच्या मुलाने 'डायल 112' वर कॉल करत पोलीस मदत मागितली. सदरची माहिती प्राप्त होताच पो.स्टे. शिरपूर येथील 'डायल 112' चे पथक ०८ मिनिटांचे आत घटनास्थळी दाखल झाले. गंभीर

जखमी अवस्थेत असलेल्या सोनुबाई खरात यांना पोलीस हवालदार संतोष पाईकराव यांनी सोनुबाईचा प्राण वाचविण्यासाठी शेतातून जवळपास ०१ किलोमीटरपर्यंत स्वतःच्या खांद्यावर घेऊन डायल 112 च्या वाहणापर्यंत पोहोचविले आणि तात्काळ वाहन शिरपूर येथील रुग्णालयात नेऊन जखमी महिलेस उचाराकामी दाखल केले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर सदर महिलेस वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकामी दाखल केले असून सोनुबाई खरात यांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. सोनुबाई खरात यांच्या

मुलाच्या फिर्यादीवरून पो.स्टे. शिरपूर येथे विविध कलमांन्वये ०८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.सदरची कारवाई पो.स्टे. शिरपूरचे सपोनि. जगदीश बांगर, पोउपनि.शरद साठे,सपोउपनि. शकील खान, पोहेकॉ. संतोष पाईकराव, नापोकॉ. श्रीकृष्ण नागरे, पोकॉ. प्रवीण गोपनारायण व पोकॉ.सतीश चव्हाण यांनी पार पाडली. पोलीस हवालदार संतोष पाईकराव यांनी महिलेचा जीव वाचविण्यासाठी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे सदर महिलेचा जीव वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या