💥शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या खत बि-बियान विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची 'छावा'ची मागणी💥
पुर्णा (दि.०६ जुन २०२२) - शहरासह तालुक्यात पावसाळ्यातील खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरूवात होणार असल्यामुळे खत व बि-बियान विक्रेत्यांनी अन्नदाता शेतकऱ्यांच्या आर्थिक लुबाडणूकुसाठी कंबर कसल्याचे निदर्शनास येत असून बाजारात सोयाबीन/कापूसाची बोगस बियान विक्री होतांना पाहावयास मिळत असून काही खत बि-बियान विक्रेत्यांनी खतांचे साठे करीत कृत्रिम खत टंचाई निर्माण करून खत ज्यादा दराने विक्री करण्यास सुरूवात केली आहे.
त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांनी या गंभीर प्रकाराची वेळीच दखल घेऊन खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करीत ज्यादा दराने खतांची विक्री करणाऱ्या खत विक्रेत्यांवर व सोयाबीन/कापसाची बोगस बियान विक्री करून शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक सोशन करणाऱ्या खत/बि-बियान विक्रेत्यांसह बोगस बि-बियानांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पुर्णा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाव्दारे आज सोमवार दि.०६ जुन २०२२ रोजी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष गजानन सवराते यांनी केली असून त्यांनी दिलेल्या निवेदनावर मा.सरपंच उध्दव सवराते,तिरुपती सवराते,विष्णू सवराते,राम सवराते,हनुमंत सवराते,किशन सवराते आदींच्या स्वाक्षरी आहेत......
0 टिप्पण्या