💥पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन,असे ट्विट हार्दिक पटेलने केल आहे💥
✍️ मोहन चौकेकर
अहमदाबाद: काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी आज भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेलने पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट हार्दिक पटेलने केल आहे.
पक्ष प्रवेशाआधी हार्दिक पटेल याने जोरदार शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली.हार्दिक पटेल याचा भाजप प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याने हार्दिक पटेल याने भाजपमध्ये प्रवेश केला.
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या