💥कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.....!


💥परभणी तालुक्यातील मौ.हसनापूर येथे घेण्यात आला प्रशिक्षण कार्यक्रम💥

परभणी (दि.०१ जुन २०२२) परभणी तालुक्यातील मौ.हसनापूर येथे आज बुधवार दि.०१ जून २०२२ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत जिल्हाअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण २०२२-२३ कार्यक्रम घेण्यात आला या प्रशिक्षणाचा विषय खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षण असा होता आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा .श्री. राजेश काटकर सर अप्पर जिल्हाधिकारी परभणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विजयकुमार लोखंडे सर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा परभणी, मा. श्री. श्रीकृष्ण नखाते सर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी, श्री. डॉ.अमित तुपे सर वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र परभणी, श्री. सवाई सिंह शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र परभणी,  श्री. डॉ. संदीप जगताप तंत्र अधिकारी परभणी, श्री सचिन सपाटे आधार मल्टीस्टेट व्यवस्थापक परभणी, हे सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. स्वाती राजेंद्र घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळ कृषी अधिकारी श्री. भगवान कच्छवे सर तर आभार प्रदर्शन श्री. श्रीकृष्ण रेंगे सर कृषी पर्यवेक्षक परभणी यांनी केले श्री. राजेश काटकर सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा असावी परंतु एकच पीक प्रत्येक शेतकऱ्यांनी तेच तेच  पिक घेऊन करू नये तर काहीतरी नाविन्यपूर्ण पिके घ्यावेत आणि त्यामधून आपल्याला जास्तीत जास्त कसा नफा मिळवता येईल याकडे लक्ष द्यावे तसेच गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन मोठमोठे प्लांट उभारावेत आणि एकत्र येऊन शेती पूरक व्यवसाय करावेत आणि कृषी विभाग विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र या सर्वांच्या सहकार्याने शेती पूर्वक व्यवसाय करावेत असे आव्हान केले तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा परभणी श्री. विजय लोखंडे यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा प्रक्रिया उद्योग करावेत योजना समजून घ्याव्यात काही अडचण असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आव्हान केले तसेच श्री. श्रीकृष्ण नखाते सर यांनी शेतकऱ्यांनी शेती सोबत जोड धंदा म्हणून जे काही दुसरे व्यवसाय असतील तेही करावेत आणि शेतकऱ्यांना वाहनां विषयी तसेच वाहन परवाना मिळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच श्री. अमित तुपे यांनी शेतकऱ्यांनी मार्केटिंग करणं किती गरजेच आहे तसेच भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले श्री. सवाई सिंह यांनी शेतकऱ्यांना खरीप पूर्व नियोजन म्हणजेच बीज प्रक्रिया, उगवण क्षमता, बियाणे वाणाची निवड, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच हा कार्यक्रम शेतकऱ्यांचा असल्यामुळे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहून शेतकऱ्यांनी स्वतःचे अनुभव महत्त्वाच्या असल्यामुळे माखणी येथील प्रगतशील शेतकरी श्री. जनार्दन आवरगंड त्यांनी सुरू केलेला प्रक्रिया उद्योग त्यामध्ये आंब्याचे लोणचे, लिंबू लोणचे, वाळकाच्या ऊसरया वेगळ्या प्रकारच्या पापड, पापड्या, मसाले हे आत्मा अंतर्गत स्थापन असलेल्या गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन कशाप्रकारे प्रक्रिया करून स्वतःचा शेतमाल घरपोच विक्री करून चार पैसे जास्त कसे मिळवता येतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच खानापूर येथील प्रगतशील शेतकरी श्री. पंडित थोरात यांनी शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे आणि ते कसे करायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच मिरखेल येथील प्रगतशील शेतकरी श्री. धनंजय देशमुख यांनी दोन वर्षापासून टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड कशाप्रकारे करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवलं आणि शेतकऱ्यांनी बीबीएफ यंत्राची वाट न पाहता टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यास भरपूर उत्पन्न मिळते याबाबत मार्गदर्शन केले, तसेच संत सावता माळी स्वयंसहायता शेतकरी आत्मा गट या गटाचे अध्यक्ष श्री. प्रकाश हरकळ यांनी शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत गट स्थापन करून गट सक्षमीकरण करणे शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचे आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले ,तसेच या कार्यक्रमामध्ये बीबीएफ यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना बीबीएफ लागवडीबद्दल श्री श्रीकृष्ण रेंगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच श्रीमती. स्वाती घोडके यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व तसेच माती नमुने कशा प्रकारे काढायचे व कधी काढायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाला हसनापुर, आर्वी, पेडगाव तसेच वेगवेगळ्या गावातून प्रगतशील शेतकरी आपले अनुभव इतर शेतकऱ्यांना सांगण्यासाठी उपस्थित होते तसेच संत सावता माळी बचत गटाचे सर्व सदस्य श्री एस जी शिंदे यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले आणि भाजीपाला ग्रुपचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या