💥शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या समन्वयातूनच शैक्षणिक प्रगती होते : चित्राताई गोळेगावकर


💥असाच समन्वय ठेवून शिक्षक पालक विद्यार्थी यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी असे ही त्या म्हणाल्या💥 

गंगाखेड (दि.२२जून) येथील ममता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ दिनांक 22 जून 2022रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालिका चित्राताई गोळेगावकर म्हणाल्या आजच्या परिस्थितीत शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या समन्वयातूनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते व असे गुणवंत विद्यार्थी निर्माण होतात. म्हणूनच  विद्यार्थ्यांबरोबरच पालक शिक्षकांचाहीगुणगौरव आहे असे मी मानते. असाच समन्वय ठेवून शिक्षक पालक विद्यार्थी यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी व शैक्षणिक प्रगतीबरोबरच आदर्श व्यक्ती निर्माण व्हावेत  

          याप्रसंगी गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ममता विद्यालयाचे अध्यक्ष एडवोकेट गोविंदरावअळनुरे बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई तुषार भैय्या गोळेगावकर शाळेचे प्राचार्य गोविंद चोरघडे उपप्राचार्य दिपक गोरे गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक विलास केंद्रे विजय बडे ,सावंत, निटूरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी विद्यालयाचा बारावी सायन्सचा निकाल 100%बारावी वाणिज्य निकाल 100% व बारावी कला निकाल 84% असून प्रत्येक शाखेतून प्रथम द्वितीय विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला बारावी सायन्स मधून प्रथम संतोष बिराजदार द्वितीय कल्याण सावंत द्वितीय वैष्णवी घनवटे बारावी कॉमर्स शाखेतून प्रथम सुलोचना भुमरे द्वितीय निकिता गायकवाड 12वी कला शाखेत प्रथम पठाण भाग्यश्री परखड 

     तसेच दहावी परीक्षेचा निकाल 97.3 79% असून 90 पेक्षा जास्त गुण घेणारे 30 विद्यार्थी 75 पेक्षा जास्त गुण घेणारे 114 विद्यार्थी व प्रथम श्रेणीत 99 विद्यार्थी उत्तीर्ण झाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या