💥पुर्णेतील बुध्द विहार येथे ज्येष्ठ पौर्णिमे निमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन....!


💥धम्म देशना व सत्कार समारंभाचे आयोजन भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे💥

पूर्णा : येथील बुध्द विहार याठिकाणी मंगळवार दि.14 जूनला जेष्ठ पौर्णिमे निमित्त धम्म देशना व सत्कार समारंभाचे आयोजन भदंत डॉ.उपगुप्त महाथे रो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.सकाळी 5.30 वाजता परित्रान पाठ व ध्यान साधना .दुपारी 12.30 वाजता भदंत डॉक्टर उप गुप्त महाथेरो,भंते पय्यातीस,भंते पय्यावांश ,भंते संघ रत्न यांची धम्म देशना .

प्रमुख वक्ते म्हणून लातूर येथील सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ.उमाकांत होनराव ,प्राचार्य डॉ सुरेश वाघमारे समाज भूषण केशव कांबळे,पँथर नेते विनोद खटके नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉ.अनंत सूर्यवंशी सेवानिवृत्त अभियंता यशवंत गच्चे परळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तूषाम आदी उपस्थित राहणार आहेत.परभणी येथील धम्म उपसि का मालाबई विलास वेडे यांच्या कडून उपस्थितांना भोजन दान व नांदेड येथील उपसी का अश्विनी दिपक जोंधळे यांच्याकडून खीर दान करण्यात येईल. स्मुर्ती शेष एन. टी. ढगे गुरुजी यांच्या स्मरणार्थ परिवाराकडून भिक्कू संघास चिवरदा न करण्यात येईल.

वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे  विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा  व महिला मंडळाच्या यांच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या