💥आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या प्रयत्नांना यश💥
गंगाखेड (दि.२२ जुन २०२२) - शासकीय अध्यादेश असतांनाही तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसिल कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो का नाही? असा जाब आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नायब तहसिलदार विचारताच बुधवारी दुपारी गंगाखेड तहसिल कार्यालयात तात्काळ फोटो लावण्यात आला.
आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर हे शेतकऱ्यांच्या कामासाठी एक महिन्यापूर्वी तहसील कार्यालयात गेले असता तहसीलदार गोविंद येरमे यांना कार्यालयात अहिल्यादेवी होळकर फोटो त्यांचा फोटो नाही व तो लावावा अशी विनंती केली होती. तहसीलदार यांनी वरवरचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात फोटो लावलाच नाही.काल बुधवारी गंगाखेड तालुका ग्राहक पंचायत सचिव मुंजाभाऊ लांडे, मालेवाडी ते धनंजय सोपने, सामाजिक कार्यकर्ते राहुल साबने आदींनी तहसील कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा फोटो लावलेला नव्हता. तहसीलदार कार्यालयात नव्हते. त्यानंतर ही बाब नायब तहशिलदार कांबळे यांच्या कानावर घातली व त्यांना फोटो का नाही असा जाब विचारला. फोटो तात्काळ लावण्यात येईल आणि तुमच्या उपस्थितीतच लावू असे आश्वासन देत नायब तहसिलदार कांबळे जाग्यावर उठले. तहसीलदार यांच्या मुख्य केबिनमध्ये जात शिपायाच्या हाताने फोटो बोलावून घेत तो तात्काळ लावण्यात आला . फोटो लावण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झालेली तारांबळ पाहता ग्रामीण भागातून कामासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केली होती.....
0 टिप्पण्या