💥वशिम जिल्ह्यातील रस्ते अपघातातील जखमी इसमांना तात्काळ मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार...!


💥जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांचेकडुन सत्कार💥

फुलचंद भगत

वाशिम (दि.२१ जुन २०२२) :- वाशिमचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी रस्ते अपघातामधील जखमींना मदत करणारे व त्यांचे प्राण वाचविणाऱ्या विदयार्थ्यांचा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे आज मंगळवार दि. २१.जुन २०२२ रोजी सत्कार केला.

                 जगामध्ये अनैसर्गिकरित्या मृत्युमुखी पावणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे रस्ते अपघातामध्ये वाहनांचा अपघात होवुन मरण पावणाऱ्या लोकांचे आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाचा सर्वात जास्त भर हा वाहतुक नियमन व अपघातातील जखमींना तात्काळ वैदयकीय मदत या दोन बाबींवर असतो.संत गाडगेबाबा विदयापीठ, अमरावती संलग्न श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविदयालय,वनोजा येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकातील १४ विदयार्थ्यांमार्फत मागील दोन वर्षापासुन सतत रस्ते

अपघातामध्ये जखमी होणाऱ्या शेकडो अपघातग्रस्त नागरीकांना वेळीच वैदयकीय मदत देवुन त्यांचे जीव वाचविण्याचे कार्य करीत आहेत. याचबरोबर त्यांनी इतर नैसर्गिक व अनैसर्गिक अपघातांच्या घटनांमध्ये नागरीकांना मदत केलेली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा वाहतुक शाखेचे पोनि उदय सोयस्कर यांनी केले व त्यानंतर पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी रस्ते अपघातामध्ये जखमींना तात्काळ मदत करणाऱ्या १४ विदयार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवुन सत्कार केला. सन्मानित विदयार्थ्यांच्या वतीने आदित्य इंगोले यांनी त्यांचे पथकाचे कामकाज व त्यांचे अनुभव यांचे विषयी सर्वांना माहिती दिली.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी त्यांचे मार्गदर्शनपर भाषणामध्ये वाशिम पोलीस दलाचा कार्यभार स्विकारला तेव्हा पासुन प्रशासनाच्या अनुषंगाने ज्या बाबींना प्राधान्य दिलेले आहे त्यापैकी वाहतुकीचे नियमन कारवाई व रस्ते अपघातामध्ये मरण पावणाऱ्या इसमांचे प्रमाण कमी करणे यावर विशेषत्वाने भर दिलेला आहे. वाशिम जिल्हयामध्ये मागील दोन वर्षांत झालेल्या प्राणांतिक अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या इसमांचे सरासरी प्रमाण १३८ इतके असुन ते अत्यल्प करण्यावर भर देण्यात येत आहे.

वाशिम पोलीस दलामध्ये जिल्हा वाहतुक शाखा व शहर वाहतुक शाखा तसेच पोलीस स्टेशन येथील वाहतुक अंमलदार असे एकुण ५ अधिकारी व ७० अंमलदार असे कार्यान्वीत असुन रस्ते अपघात कमी व्हावे याकरीता ई-चलानद्वारे जास्तीत जास्त कारवाया करण्यात आलेल्या असुन वाहतुक नियमांचे ऊल्लंघन करण्याच्या वाहनचालकांविरूध्द एकुण ६७९३४ चलान करण्यात आलेले असुन त्यामध्ये १,२२,५०,४००/- रू. चा दंड वसुल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट वाहनचालकांविरूध्द एकुण १९८०५ कारवाई करण्यात आला असुन त्यामध्ये ६९,३०,५०० /- रूपयांचा दंड वसुल करण्यात आला व विना सिटबेल्ट वाहनचालकांविरूध्द एकुण १३५३७ कारवाईमध्ये २५,००,५००/- रूपयाचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. वाशिम जिल्हयामध्ये ज्या ठिकाणी वारंवार रस्ते अपघात होतात,अशा ठिकाणे ब्लॅक स्पॉटची पडताळणी करून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येतात. सध्या जिल्हयामध्ये वाशिम शहरातील अकोला नाका ते पाटील ढाबा, मेहकर रोडवरील कुकसा फाटा व पातुर रोडवरील रिधोरा फाटा असे ३ ब्लॅक स्पॉट असुन नव्याने २ प्रस्तावित आहेत. याचबरोबर रस्ते सुरक्षा संबंधाने जनजागृती व्हावी याकरीता शाळा, महाविदयालयातील विदयार्थी यांना वाहतुक नियमांची माहिती देण्यात येते रस्ते अपघातामध्ये जखमींना तात्काळ मदत करणाऱ्या नागरीकांना पोलीस किंवा इतर कारवाईची भिती किंवा संभ्रम मनामध्ये न ठेवता अशा जखमी इसमांना तात्काळ वैदयकीय मदत मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 त्याकरीता केंद्र शासन स्तरावर "सुवर्णतास योजना सुरू करण्यात आलेली असुन त्यामध्ये अपघातग्रस्त इसमांना मदत करणाऱ्या नागरीकांना बक्षीस म्हणुन रोख रक्कम व प्रशस्तीपत्र सुद्धा देण्यात येणार आहे.संत गाडगेबाबा विदयापीठ, अमरावती संलग्न श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविदयालय, वनोजा येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकातील १) आदित्य इंगोले, २) नयन राठोड, ३) सचिन राठोड, ४) राहुल साखरे, ५) अनिकेत इंगळे, ६) बुध्दभुषण सुर्वे, ७) प्रथम सिंकटवार, ८) जगदेव अवगण,९) ज्ञानेश्वर खडसे, १०) किर्तीराज भगत, ११) ओम वानखडे, १२) सुमित राठोड, १३) प्रविण गावंडे व १४) ऋषिकेश येवले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाकंरीता वाहतुक शाखेचे पोनि उदय सोयस्कर,पो.नि.धनंजय जगदाळे आणि अंमलदार हजर होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या