💥शेतकरी सुपुत्राने पोलीस उपनिरीक्षक पदी गवसणी घातल्याने अवघ गाव मिरवणुकीत सहभागी💥
काजळा : 'दिल भी दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए' या देशभक्तीपर गीतांसह डॉल्बीच्या निनादात अन् हलगीच्या कडकडाटात काजळा (ता. उस्मानाबाद) येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल राम रतन लिंगे यांचा गावातून भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. गावच्या शेतकरी सुपुत्राने पोलीस उपनिरीक्षक पदी गवसणी घातल्याने अवघा गाव मिरवणुकीत सहभागी झाला होता.
काजळा येथील राम रतन लिंगे या शेतकरी कुटुंबातील सुपुत्राने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. नुकताच त्यांचा नाशिक येथे दिक्षांत समारंभ संपन्न झाला. श्री लिंगे यांनी गावातून पहिले पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान पटकावला आहे. मुंबई शहर येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर काजळा गावात आगमन होताच कुटुंबीय व ग्रामस्थांच्या वतीने डॉल्बीच्या गजरात व हलगीच्या कडकडाटात त्यांचे जंगी सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रकात मडके, विनोद बाकले, शिवाजी हाजगुडे, रामचंद्र कदम, नंदकुमार हाजगुडे, उमेश पवार, रोहित पाटील, चेतन लोमटे, नवनाथ मोटे, अविनाश शेळके, अजित शेळके, आबा माळी, मनोज कदम, हभप रवि आहेर, प्रा. विकास राऊत, अमोल कदम, लक्ष्मण लिंगे, डॉ.लिंगे, परमेश्वर माळी, राहुल आहेर, वैभव हाजगुडे, अजित शेळके, शिवाजी लोमटे, सोमनाथ माळी, आकाश हाजगुडे, शरद कांबळे, भूषण आहेर, अविनाश आहेर, राहुल मडके, बापू माळी, अतुल आहेर, शुभम सुरवसे, काकासाहेब देशमुख, भैय्या इंगळे, मडके, सतिश कांबळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....
0 टिप्पण्या