💥साखरा मंडळातील पेरण्या खोळंबल्या शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली मात्र जिल्ह्यातील काही तालुक्यातील समाधानकारक पाऊस पडला तर काही तालुक्य अद्यापही एक हि पाऊस समाधानकारक झाला नाही.
सेनगाव तालुक्यातील साखरा .हिवरखेडा बोरखेडी .खडकी. धोतरा .केलसूला या सह परिसरातील अनेक गावांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही त्यामुळे शेतीचे कामे देखिल खोळंबली आहेत आत्ता पर्यन्त शेतातील नांगरणीचे ढेकळे पण तसेंच आहेत शेतात .वखरनि करायची पण पाऊसन झाल्या मुळे हें शेतातील ढेकळे फुटत नाहीत आत्ता बळीराजा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत .खत बि बियाणे सर्व शेतकऱ्यांनी आणून ठेवले आहेत आत्ता प्रतीक्षा फ़क्त पावसाची आहे
सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळ अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे, जून महिना सरत आला तरीही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. साखरा मंडळातील शेतकर्यांनी पेरणी पूर्वीचे मशागतीची कामे पूर्ण करून पेरणी ची संपूर्ण तयारी केली आहे, मात्र पाऊस नसल्यामुळे पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे, जून महिना संपत आला तरीही पेरणी झालेली नाही, त्यामुळे पेरणी झाल्यानंतर उत्पन्नात मोठी घट होणार आहे, तर एकीकडे राज्याचे राजकारण नाट्यमय चालू आहे, तर एकीकडे राज्याची कृषिमंत्री मात्र शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून राज्याच्या बाहेर गेले आहेत, मतदार मोठ्या आशेने मतदान करतो मात्र अनेक आमदार राज्यातील स्वतःच्या स्वार्थासाठी पळून जाऊन पक्षाशी बंडखोरी करतात, सरकार कोणतेही स्वार्थासाठी स्थापन करतात, सरकार कोणतेही स्थापन झाले तरीही ते त्यांच्या स्वार्थासाठीच असते, शेतकरी मात्र वाऱ्यावरच आहे, सोयाबीन तूर या नगदी पिकांना भाव नाहीत, तर एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे, शेतीची पूर्ण कामे महागली आहेत, उत्पन्नाचा वाढलेलं नाही, शेतकर्यांच्या पिकांना भाव कमीच, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे, त्यामुळे याच्यानंतर मतदार अशा आमदार खासदार मंत्री यांच्यावर नक्किच विचार करेल असे मतदार मधून बोलले जात आहे....
0 टिप्पण्या