💥या दुर्दैवी अपघातात आठ जण जखमी तर चार जणांची प्रकृती गंभीर💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोलीतील आजेगाव ते गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात हा प्रकार घडला. समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पो चालकाने करकचून ब्रेक दाबला. यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात दि 06/06/2022वार सोमवार रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील वऱ्हाडी मंडळी पिकअप व्हॅनने लग्नासाठी गोरेगाव येथे जात होते. यावेळी आजेगाव ते गोरेगाव मार्गावर गोटवाडी शिवारात अचानक एक दुचाकी वाहन पिकअप व्हॅनच्या समोर आले. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबला.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातामध्ये व्हॅनमधील शेख इमरान, शेख करीम, शेख समीर, शेख अमन, सोहिल कुरेशी, निलेश दळवी, शेख बशीर, शेख इर्शाद हे वऱ्हाडी यात जखमी झाले आहेत.
या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांनी व्हॅन बाहेर काढले. उपचारासाठी त्यांना तातडीने हिंगोलीला हलवण्यात आले. हिंगोली येथील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये डॉ. अखील अग्रवाल, डॉ. संदीप इंगळे, डॉ. मंगेश मुंडे, डॉ. मयुर अग्रवाल यांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले असून जखमींपैकी चौघांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता....
0 टिप्पण्या