💥स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई अवैध देशी दारूसह बोलेरो पिकप ताब्यात...!


💥कारवाईत अवैध दारू साठ्यासह बोलेरो गाडी असा 4 लाख 56 हजार 210 रूपयांचा माल जप्त💥

जिंतूर प्रतिनीधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर : तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कोरवाडी ते कवडा रोडवर एका बोलेरो गाडीने जात असलेले 17 बॉक्स देशी दारू स्थागुशा यांच्या पथकाने दि 12 जून रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पकडले आहे.

     बामणी पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे कोरवाडी ते कवडा या रोडवर दिनांक 12 जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास एम.एच 22 एच 4388 या गाडीतून भिंगरी संत्रा च्या देशी दारूचे 18 बॉक्स 35 बॉटल अशा जवळपास 17 बॉक्स देशी दारू 803  बॉटल प्रत्येकी 70 रुपये किमतीच्या देशी दारू आरोपी यांनी विनापरवाना बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असताना मिळून आल्याने आरोपी सचिन भगवान भुसारे ,(वय22) अमोल भगवान भुसारे (वय 19) गौतम रुस्तुम मस्के(वय 30)सर्व रा.किर्तापुर ता. मंठा जि. जालना.यांच्या विरुद्ध स्थागुशा पथकातील पो.शि.राम  बाळासाहेब पौळ यांच्या फिर्यादीवरून कलम 65 ई 83 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या ताब्यातून दारू साठ्या सह बोलेरो गाडी असा 4 लाख 56 हजार 210 रू चा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि राजेश ननावरे हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या