💥या प्रारुप मसुद्याबाबत काही हरकती असतील त्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयात ०८ जुन पर्यंत दाखल करण्याचे आवाहन💥
परभणी (दि.०२ जुन २०२२) : परभणी जिल्हा परिषदेंतर्गत गट व पंचायत समितीच्या गणांच्या संख्येसह व्याप्ती बाबतचा प्रारुप मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सर्वसामान्य नागरीकांसाठी आज गुरुवार दि.०२ जुन २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आला.
दरम्यान, या प्रारुप मसुद्याबाबत ज्या लोकांच्या काही हरकती असतील त्या हरकती जिल्हाधिकारी कार्यालयात २ जून ते ८ जुन २०२२ या कालावधीत लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे संबंधित जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणाच्या संख्येसह व्याप्ती संदर्भात संबंधित उपविभागीय अधिकार्यांनी पक्रिया सुरु केली. पाठोपाठ गुरुवारी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करणारा प्रारुप मसुदा नागरीकांसाठी प्रसिध्द केला. संबंधित उपविभागीय अधिकार्यांनी या अनुषंगाने कारवाई पूर्ण केली. पाठोपाठ त्या त्या तालुक्यात पंचायत समितीच्या कार्यालयाच्या दर्शनी भाात व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाच्या दर्शनी भागात या संबंधीचा प्रारुप मसूदा बोर्डवर झळकविण्यात आला आहे.
या प्रारुप मसुद्यामधून त्या त्या तालुक्यात जिल्हा परिषद गटाची संख्या व निर्वाचक गणांची संख्या नमूद करण्यात आली असून त्याची व्याप्तीसुध्दा दर्शविण्यात आली आहे दरम्यान या गट व गणांच्या संख्या व त्यांच्या व्याप्तीसंदर्भात एकत्रित अशी माहिती संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने सायंकाळी उशीरापर्यंत माध्यमांना दिली नाही....
0 टिप्पण्या