💥सेलूत नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे बोंबाबोंब आंदोलन...!


💥सेलू च्या नाफेड खरेदी केंद्रावर बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी गेल्या दोन दिवसापासून बंद💥 

सेलू प्रतिनिधी -

बंद असलेल्या नाफेड खरेदी केंद्र समोर हरभऱ्याच्या पोत्याला हार घालून व बोंब मारून भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांचे शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.


 सेलू च्या नाफेड खरेदी केंद्रावर बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी गेल्या दोन दिवसापासून बंद होती व आज नाफेड केंद्राच्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी सांगितले की शासनाने या हरभरे खरेदीचे पोर्टल बंद केले आहे गेल्या चार दिवसापासून शेतकरी वाहने घेऊन नाफेड केंद्र सेलू समोर हरभरा घेतील या आशेवर उभे आहेत

शासनाच्या नवीन जीआर नुसार दिनांक 18 जून 2022 पर्यंत सात लाख 76 हजार मेट्रिक टन हरभरा खरीदी चे उद्दिष्ट आहे पण या जीआर ला शासनानेच हरताळ फासून आज दिनांक 3 जून दोन हजार बावीस पासून हरभरा खरेदी बंद केले आहे याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी सेलू शेतकर्‍यांच्या वतीने बंद असलेल्या केंद्रा समोर खुर्चीवर हरभऱ्याचे पोते ठेवून त्याला हार घालून प्रदक्षिणा घालत बोंब मारत शासनाचा निषेध करण्यात आला व उपजिल्हाधिकारी सेलु यांना निवेदन देण्यात आले की येत्या दोन दिवसात हरभरा खरेदी सुरू नाही केली तर नाफेड केंद्र समोर बेमुदत उपोषण करण्यात येईल व यात जर काही परिस्थिती उद्भवली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील

यावेळी भाजप जिल्हाउपाध्यक्ष जयसिंग शेळके, माणिक शेळके, भगवान डख, बाबासाहेब आंधळे,शंकर शेळके, बाबासाहेब आंधळे निशिकांत रोडगे, सतिश इघारे,पवन रोडगे, कृष्णा रोडगे, दिलीप ताठे, बालासाहेब बालटकर,रवि मोगल, रामा बोडखे, नामदेव पौळ, गोपाळ करवा व शेतकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या