💥या अपघातात दोघे जण गंभीर जखमी💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
ट्रॅक्टरचे समोरील टायर फुटल्याने अपघात होऊन दोघे जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मालेगाव तांडा पाटीवर घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथून विनाट्रॉली, विना नंबरचे आयशर ट्रॅक्टर जिंतूरकडे जात होते. मालेगाव तांडा पाटीजवळ आले असता ट्रॅक्टरचे समोरील टायर अचानक फुटल्याने, ट्रॅक्टर पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन एका खड्ड्यात पडले.
यामध्ये ट्रॅक्टर चालक सुधाकर आप्पा वय 58 रा. चारठाणा ता. जिंतूर, व पंढरीनाथ माधवराव बुधवंत वय 38 रा. पांगरी ता.जिंतूर हे दोघे जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात डॉ. काळे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठवण्यात आले आहे.
सदर अपघात एवढा भीषण होता की यामध्ये ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही....
0 टिप्पण्या