💥नियुक्तीपत्र प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने व महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घाडकेंच्या हस्ते प्रदान💥
परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी कार्यकारणी ची बैठक आज दि. ०६ जून २०२२ रोजी पक्षाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्वांनु मते परभणी शहरात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आरतीताई जुमडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या परभणी शहर महिला आघाडी शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घाडके यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शेख बशीर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
0 टिप्पण्या