💥पालकांनी आपली इच्छा विद्यार्थ्यांवर लादू नये : सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांचे प्रतिपादन...!


💥येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या💥

 जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी.रामपूरकर

जिंतूर - पालकांनी आपल्या पाल्याची क्षमता व आवड याचा विचार करूनच आपल्या पाल्याला त्याच्या आवडीनुसार शिक्षण घेऊ देणे गरजेचे आहे. परंतु पालक मात्र आपल्याच मनातील इच्छा पाल्यावर लादताना दिसतात असे प्रतिपादन परभणी येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले.


      येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर भोंबे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गीता ज्ञानदेव गुठ्ठे, सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, उपप्राचार्य एम एस दाभाडे हे उपस्थित होते. पुढे बोलताना गीता गुठ्ठे म्हणाल्या की मुली आता धीठ होत आहेत. त्या शिक्षणाच्या प्रवाहात येत असून त्यांनी डॉक्टर इंजिनियर तर  व्हावाच त्यासोबतच एमपीएससी व यूपीएससी सारख्या परीक्षेची तयारी करून अधिकारीही व्हावं. याच कार्यक्रमात  दहावीतील व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. विज्ञान शाखा: शिवानी राठोड- प्रथम ,अमिता घनसावंत- द्वितीय, सानिका रणसिंग- तृतीय. कला शाखा: अनिमेश जिंतुरकर- प्रथम, अनिकेत गरकळ- द्वितीय, पुनम काकड -तृतीय  वाणिज्य शाखा: कृष्णा कोकडवार- प्रथम, वैष्णवी शिरसागर -द्वितीय, शिवकन्या आव्हाड- तृतीय. एच एस सी वोकेशनल कोर्स :कैलास काकड- प्रथम, गौतम भदर्गे-  द्वितीय, शेख सुफियान-द्वितीय, गौतम भोंगे -तृतीय. यांचा सत्कार करण्यात आला .      

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्रीधर भोंबे  म्हणाले की हुशार व होतकरू परंतु परिस्थितीने गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय ज्ञानोपासक महाविद्यालय करेल, तसेच बारावी कला शाखेतील दिव्यांगातून तालुक्यातून प्रथम आलेला विद्यार्थी अनिमेश जिंतुरकर याच्या पुढील  शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी ज्ञानोपासक महाविद्यालयाने घेतली असल्याचेही त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य एम एस दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पांडुरंग निळे तर आभार प्रा.सुरेश पारवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालय अधीक्षक चंद्रकांत  पत्तेवार, पर्यवेक्षक सी डी भड, प्रा रमेश रणसिंग, डॉ अशोक वैद्य, संतोष कदम, प्रा.नारायण शिंदे, प्रा.अखिलेश यादव प्रा.गजानन सानप आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या