💥शहरी भागातील बस सुरू झाल्या आणि ग्रामीण भागातल्या बस अजून सुध्दा सुरू नाही💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे कोरणा काळ लागला त्यामुळे बस बंद होत्या त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील बस तसेच शहरी भागातील बस बंद पडल्या पण शहरी भागातील बस सुरू झाल्या आणि ग्रामीण भागातल्या बस अजून पण सुरू नाही झाल्या त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अवैधरित्या अवैध वाहनातून प्रवास करावा लागत आहे या मुळे अपघात होत आहेत याकडे प्रशासनाने दखल घेऊन ग्रामीण भागातील लालपरी सुरू करावी ग्रामीण भागातील प्रवाशांची हेळसांड थांबवावी. लवकरात लवकर ग्रामीण भागात लालपरी पाठवावी जेणेकरून दळणवळण यांचा मार्ग सुखकर होईल अशी मागणी ग्रामीण भागातील प्रभूंच्या कडून होत आहे.....
0 टिप्पण्या