💥हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आपल्या लाडक्या वैष्णवी घोडीचा वाढदिवस साजरा....!


💥हिंगोली जिल्ह्यातील वरून गवळी येथील शेतकरी अक्षय राजेश बेंगाळ यांनी केला चक्क घोड्याचा वाढदिवस साजरा💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

सध्याच्या डिजिटल युगात वाढ दिवस साजरे मोठ्या प्रमाणात होत आहेत मात्र हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या घोडीचा मोठा वाढ दिवस साजरा केला आहे त्यामुळे या वाढ दिवसाची चर्चा जिल्हा भरात होत आहे 

हिंगोली जिल्ह्यातील वरून गवळी येथील शेतकरी अक्षय राजेश बेंगाळ यांना घोड्या पाळण्याचा चांगलाच शौक आहे त्यांनी दि 01/07/2022 रोजी आपल्या वैष्णवी नावाच्या घोडीचा सहावा वाढ दिवस साजरा केला आहे या वाढ दिवसाला बाहेर जिल्ह्यातील अश्वप्रेमी देखिल उपस्थितीत होते सोलापूर जिल्ह्यातील त्याचे मित्र मंडळ वैष्णवी च्या वाढ दिवसाला आले होते वाढ दिवसा निमित्ताने जवळपास 600 ते 700 पाहुण्याना बोलावण्यात आले होते व गोडधोड जेवणाचा कार्यक्रम पण ठेवतात या अनोख्या वाढ दिवसाची चर्चा मात्र जिल्हाभरात होत आहे वैष्णवी घोडीच्या वाढ दिवसाचे बैंनर देखिल लावण्यात आले होते 

बेंगाव हें 1998 पासून अश्व सांभाळतात त्यांच्या कडे आत्ता चार अश्व आहेत वैष्णवी हिची किंमत 5 लाख रुपये आहे ह्या घोडीची लग्नाची सुपारी ते 11 हजार घेतात सोनी हिची किंमत 4लाख आहे हिची सुपारी 9 हजार घेतात आणि आर्ची आणि राधा ह्या पण दोन घोड्या आहेत त्यांच्या कडे त्याची सुपारी ते 7 हजार ते 5 हजार घेतात तब्बल 14 लाख रुपये देऊन त्यांनी ह्या चार अश्र्व खरेदी केली आहेत आणि त्या वर्षाला त्याना सुमारे 10 लाख रुपये कमवून देतात आणि त्यांच्या चारा.पाण्यासाठी ते तब्बल 3 ते 4  लाख रुपये खर्च करतात 

बेंगाळ यांच्याकडे 20 एकर शेती आहे आणि ते दोन भाऊ आहेत आणि ते बैल गाडा शर्यत पण खेळतात त्यांच्या कडे सुप्रसिद्ध बादशहा आणि अर्जुन या नावाची बैल जोडी आहे चालू काळात या जोडी नि हिंगोली जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता अर्जुन आणि बादशहाचा चाहता वर्ग देखिल भरपूर आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या