💥पुर्णा तालुक्यातील गौर येथे आर्थिक साक्षरता व रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन...!


💥सामाजिक संस्थांनी घेतला मार्गदर्शन शिबिर आयोजनासाठी पुढाकार💥

पुर्णा (दि.२१ जुलै) : पुर्णा तालुक्यातील मौजे गौर येथे सेबी संस्था,प्रथम एज्युकेशन फांऊंडेशन व रयत बहुऊद्येशिय सेवाभावीसंस्थेच्या वतीने मौजे गौर येथे आर्थिक साक्षरता व रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या  मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातुन सेबी संस्थेच्या ट्रेनर डाॅ.सारिका लोहाना यांनी दैनंदिन जिवण जगत असताना आपण कष्टाने कमवलेल्या पैशाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने कराव जेने करुन आपली फसवणुक होणार नाही याविषयी सविस्तर मार्गदर्शन ऊपस्तीत मंडळीना केले.


याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते गजानन सुरवसे यांनीऊपस्तीत बेरोजगार युवक युवतीना प्रथम एज्युकेशन फांऊंडेशनच्या विविध प्रशिक्षणकोर्सविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.या बरोबरच रयत बहुऊद्देशिय सेवाभावी संस्थेच्या संचालिका सौ.स्वाती सुरवसे यांनी विविध शासकिय योजनाची माहिती देवुन कोरोनामध्ये विधवा महिलांना मिशन वात्सल्यसमितीची माहिती देण्यात आली.व कोरोना काळात ऊल्लेखनिय कार्यकेल्यामुळे सरपंच,आंगणवाडीताई , महिला बचतगट प्रतिनीधी यांचा कोव्हिड योध्दा सन्मान पञ देवुन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ.चांगोनाताई पारवे यांची ,सोमेश्वर देवस्थानट्रस्टचे व्यवस्थापक सोपानकाकाका जोगदंड ,पत्रकार नारायण सोनटक्के व गावातील युवक,पुरुष,महिला आदी संख्येने ऊपस्तीत होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी बचतगट प्रतिनीधी पुजा जोगदंड,ग्रामपंचायच कर्मचारी आदीनी सहकार्य केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या