💥जोड परळीतील जिल्हा परिषद शाळेतील प्रशासनानं पाडलेल्या वर्ग खोल्या बांधून देऊन शिक्षकांची रिक्त पद तात्काळ भरा...!


💥अन्यथा तिव्र आंदोलनाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा💥

परभणी (दि.१४ जुलै) - तालुक्यातील जोड़ परळी येथे जिल्हा परिषदेची वर्ग १ ली ते ८ वी साठी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत . या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत शिवाय तीन वर्षांपूर्वी सदरील शाळेची इमारत निजामकालीन असल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने या शालेय इमारतीतील पाच वर्ग खोल्या पाडण्यात आल्या. या घटनेला तीन वर्षांचा कालावधी होऊनही जिल्हा परिषदेच्या मार्फत अद्यापही पाडलेल्या पाच वर्ग खोल्या बांधून देण्यात आल्या नाहीत त्यामुळे वर्ग १ ली ते ८ वी च्या आठ वर्ग खोल्यातील मुलांना तीन वर्ग खाल्यामध्ये शिक्षण घ्यावे लागते अनेकदा विद्यार्थ्यांना झाडाखाली बसुन वर्ग करावे लागतात ही अत्यंत गंभीर व ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था मोडीत काढणारी घटना आहे. या शाळेला मुख्याध्यापकासह ८ शिक्षकांची पद मंजूर आहेत. परंतु शाळेचे मुख्याध्यापक निलंबित झाले असून दोन शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने मागील एक वर्षापासून १८५ विद्यार्थी व १ ली ते ८ वी चे आठ वर्गासाठी केवळ चार शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षक लिपीक व इतर शालेय कामाचा इंचार्ज असल्याने केवळ तीन शिक्षकांवर संबंधीत शाळा चालू आहे. कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नसल्यानं गावातील नागरीकांनी १८५ विद्यार्थ्यांपैकी ५० ते ६० विद्यार्थ्यानी शाळेतील नाव कमी करून जोड परळी पासून ७ कि.मी. अंतरावर दूर असणाऱ्या बोबडे टाकळी जि.प. च्या शाळेमध्ये टाकले आहे जिल्हा परिषद प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे जोडपरळी येथील जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण जिल्हा परिषद च्या गलथान कारभारामुळे संपुष्टात येण्याची भिती निर्माण झाली आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे.


या बाबत आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन जोडपरळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या तात्काळ बांधण्यात याव्यात , रिक्त पदावरील शिक्षकांची तात्काळ भरती करण्यात यावी व शाळेमध्ये सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन दिले.

 मागणी नुसार तत्काळ कार्यवाही न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दि . २२ जुलै २०२२ रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल व या वेळी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत आपले कार्यालय वैयक्तिक जबाबदार असेल असा इशारा या निवेदांना द्वारे देण्यात आला आहे.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, शहर चिटणीस वैभव संघई, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, अनिल पडोळे, सय्यद समीर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या