💥जिंतूर येथे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वृक्षारोपण.....!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते आजादी का अमृत महोत्सव मोहिमेचे उदघाटन💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत, जिल्हा प्रशासन व आर.एस. कामथे कंट्रक्शन यांच्या वतीने जिंतूर ते परभणी महामार्गावर, आज सोमवारी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल  गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या वृक्ष लागवड मोहिमेत शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  आपला सहभाग होता. यामध्ये जिंतूर- परभणी या महामार्गावर रस्त्याच्या  दुतर्फा झाडे लावण्यात आली.

यावेळी  उपविभागीय अधिकारी अरुणा संगेकर तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, गटशिक्षणाधिकारी गणेश गाजरे,यांच्यासह शहरातील वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या