💥पुर्णा-झिरोफाटा मार्गावरील माटेगाव येथील पुलावरून पाणी वाहु लागल्यामुळे रहदारीचा प्रमुख मार्ग बंद💥
पुर्णा (दि.१३ जुलै) - तालुक्यात मागील तिन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे पुर्णा शहराशी अनेक गावांचा तुटला असून पुर्णा-झिरोफाटा मार्गावरील माटेगाव येथील पुलावरून तर पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील पिपळा भत्या जवळील पुलावरून पाणी ओसंबडून वाहत असल्यामुळे दोन्ही प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाल्याचे दिसत असून तालुक्यातील गणपूर कान्हेगाव,ममदापूर,लोहगाव,आहेरवाडी,एरंडेश्वर,कात्नेश्वर,कौडगाव, आदिंससह पुर्णा-गोदावरी नदीपात्रांच्या काठावरील असंख्य गावांचा संपर्क तुटला असून फुकटगाव येथील पुल कोसळल्याचे समजते.
याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची उभी पिक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून अनेक शेतकऱ्यांनी घरातील दागादागीने विकून खाजगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे काढून बि-बियान खत/औषधी खरेदी केली होती आता दुबार पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून अन् सावकाराचे कर्ज फेडायचे कुठून या विवंचनेत शेतकरी वर्ग चिंतातूर झाल्याचे निदर्शनास येत आहे.
एकंदर तालुक्यात मागील दि.११ जुलै २०२२ पासून सतत पाऊस पडत असल्यामुळे यलदरी/सिध्देश्वर धरण भरायला आल्यामुळे काही दरवाजे उघडण्यात आल्यामुळे व सतत पाऊस पडत असल्याने तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नद्यांसह ओढे नाल्यांना पुर येवून परिसरातील शेतांमध्ये पाणी घुसून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे....
0 टिप्पण्या