💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे परभणी पोस्ट बँकेच्या कँम्पची भेट....!


💥धनगर टाकळी ग्रामस्थांना दिली पोस्टाच्या विविध योजनांची माहिती💥


पुर्णा (दि.27 जुलै) - तालुक्यातील धनगर टाकळी येथे आज बुधवार दि. 27 जुलै 2022 रोजी पोस्ट बँक परभणीचा कॅम्प आला होता या मध्ये बँकेच्या विविध योजना, खाते काढून देणे,399 मध्ये 10 लाखाचा विमा, सुकन्या योजना, लहान मुलांचे आधार कार्ड काढून दिले, अस्या विविध योजना काढून देण्याचा कॅम्प राबविण्यात आला. 


या कॅम्प मध्ये 12 पोस्ट ऑफिसचे शासकीय कर्मचारी यांची टीम आली होती.10 ला सुरु झालेला कॅम्प लोकांच्या भरपूर प्रतिसादामुळे सायंकाळी सहा पर्यंत चालला. या कॅम्प मध्ये मुख्य अधिकारी म्हणून व्ही यु कुलकर्णी सहाय्यक अधीक्षक उप विभाग परभणी हे उपस्थित होते हा कॅम्प स्वदेस फॉउंडेशन धनगर टाकळी (संस्थापक अध्यक्ष प्रा. सैनाजी माठे )यांनी धनगर टाकळी येथे आयोजित केला होता.या कॅम्प मध्ये एकूण 450 गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता.राबवलेल्या स्तुत्य सामाजिक उपक्रमामुळे  पूर्ण तालुक्यात या उपकृमाचे कौतुक होतं आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या