💥तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्रच्या वतीने करण्यात आले आयोजन💥
परळी (दि.०५ जुलै) - तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळी च्या वतीने भीम नगर साठे नगर व प्रबुद्ध नगर येथील दहावी-बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रज्ञा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन एडवोकेट आनंदरावजी जगतकर यांच्या मार्गदर्शना खाली सोमवार दिनांक २५ /०७/२०२२ रोजी भीम नगर येथील माता रमाई आंबेडकर सभागृहात दुपारी बारा वाजता भीम नगर साठे नगर व प्रबुद्ध नगर येथील जे विद्यार्थी दहावी बारावी पास झाले आहेत व ज्या व्यक्तींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशाचाही सत्कार कैलासवासी दलित मित्र शंकररावजी जगतकर यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी व प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार असून मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ही करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमासाठी जे विद्यार्थी दहावी व बारावी पास झाले आहेत त्यांनी मार्क मेमो ची झेरॉक्स व दोन पासपोर्ट फोटो देऊन आपले नाव नोंदवावे असेही आवाहन तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे....
0 टिप्पण्या