💥तर शहराध्यक्ष पदावर दिलीप देवकर यांची निवड💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
सातत्याने ग्राहकांचे हित जोपासणारी एकमेव संघटना असलेली अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची महिला कार्यकारणी तसेच शहर कार्यकारणी गुरूवार 7जूलै रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी तालुका महिला तालुका अध्यक्षपदी समाजसेविका आशाताई खिल्लारे तर शहराध्यक्षपदी दिलीप देवकर यांची यावेळी निवड करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी,अखिल भारतीय ग्राहक पंचायत महिला कार्यकारिणीची निवड अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे ही निवड पार पडली. यावेळी उपाध्यक्ष पदी विमल प्रधान, सचिव संध्या खिल्लारे, सहसचिव संगीता ठोके, कोषाध्यक्ष सुमन प्रधान, तालुका संघटक लक्ष्मीबाई गुहाडे ,सदस्य शेख अन्सारी यांची निवड करण्यात आली. तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत शहर कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली.यावेळी शहराध्यक्षपदी दिलीप देवकर ,शहर उपाध्यक्ष संतोष रोकडे, सचिव महेश देशमुख ,सहसचिव बाबाराव डोंबे, कोषाध्यक्ष सुधाकर गजभारे, कोषाध्यक्ष पवन देशमुख,यांची यावेळी निवड करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य तसेच ग्राहकांचे अधिकार याबाबतची माहिती डॉ. विलास मोरे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना दिली कार्यक्रमासाठी जिंतूर तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे ,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, सचिव मंचकराव देशमुख, यांच्यासह आबासाहेब देशमुख ,किसन खाडे ,एकनाथ अवचार यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती....
0 टिप्पण्या