💥जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी सर्वांची - सखाराम बोबडे पडेगावकर


💥गंगाखेडच्या एकमेव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद💥 

गंगाखेड- प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळेतच खरे गुणवान विद्यार्थी घडतात. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्याची जबाबदारी सर्वांची असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर  यांनी गंगाखेड येथे सोमवारी शहरातील एकमेव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना दिली.

सोमवारी गंगाखेड शहरातील एकमेव जिल्हा परिषद शाळेस आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर , सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक भगवान ठूले सर यांनी त्यांचे स्वागत केले. आठवी ते दहावी चे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत यावेळी ग्रामीण भागातील उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या भरपूर होती. यावेळी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शाळेत काय काय सुविधा हव्यात, पिण्याचे पाणी, शौचालय, मुतारी आदी सुविधा आहेत का? त्याचबरोबर प्रवासामध्ये काय अडचणी येतात, शाळेची वेळ आणि बसची वेळ बरोबर आहे का? आदी विषयावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनीनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने सांगितल्या. झोला येथील बंद झालेली मानव विकासची बस तात्काळ सुरू करणे, कोद्री मार्गावरील शाळा सुटण्याची वेळ आणि बसची वेळ यांचा मेळ घालणे आदी जबाबदाऱ्या आगामी चार दिवसात सोडविल्या जातील अशी ग्वाही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी लवकरच बोर पाडला जाईल यासाठी बिडिओ आणि जिल्हाधिकाऱ्यांशी लवकरच प्रत्यक्ष भेटून मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या