💥जिंतूर महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे घडली दुर्दैवी घटना....!

 


💥शहरातील पठाण मोहल्ल्यात विद्युत प्रवाह असलेला तार तुटून 18 वर्षीय युवक गंभीररीत्या जखमी💥               

 जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी.रामपूरकर

जिंतूर शहरातील पठाण मोहल्ला परिसरातील विद्युत प्रवाह असलेला तार तुटून एका 18 वर्षीय युवकाच्या अंगावर कोसळून युवक गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना रविवार 10 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. गंभीर युवकाला विजेचा तीव्र झटका बसल्याने युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. सदरील प्रकार महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे घडल्याची चर्चा घटनास्थळावर ऐकावयास मिळाली. 

              शहरातील पठाण मोहल्ला परिसरात महावितरणच्या भोंगळ व नियोजनशून्य कारभारामुळे मागील अनेक महिन्यांपासून सर्वच विद्युत तारा प्रचंड प्रमाणात लोम्बकळत आहे. सदरील विदारक परिस्थितीची नागरिकांनी महावितरणला जाणीव करून दिल्यानंतर ही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने बहुसंख्यवेळा विद्युत तारा तुटून खाली पडण्याचे प्रकार घडत आहे. त्यातच रविवार 10 जुलै रोजी शहरातील 18 वर्षीय युवक शेखर चव्हाण दुचाकीवरून पठाण मोहल्ला परिसरातून जात असतांना अचानक त्याच्या अंगावर विद्युत प्रवाह असलेला तार अंगावर कोसळल्याने तो दुचाकीवरून जमिनीवर पडला मात्र त्याच्या हातात विद्युत तार अडकल्याने त्याला काही क्षण विजेचे तीव्र झटके बसले हे प्रकार परिसरातील सय्यद अबुजर यांनी बघितल्यानंतर त्याने लाकड्याच्या साह्याने तारापासून युवकाला बाजूला काढले पण या घटनेत अपघातग्रस्त युवकाचा खांदा तसेच दोन्ही हात गंभीर जखमी झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी दुचाकीवर युवकास उपचारार्थ दाखल केले. परंतु या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या युवकाची प्रकृती चिंताजनक आहे. सदरील प्रकार महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे घडल्याची चर्चा घटनास्थळावर नागरीकातून ऐकावयास मिळाली.

* महावितरण अधिकारी परगावी :-

 घटना घडतातच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी उपअभियंता कोळपे यांच्याशी संपर्क साधले असता त्यांचे म्हणणे होते की दुपारी दोन वाजेपर्यंत सेवा बजावून मी नांदेड येथे गेलो असून इतर कर्मचारी त्या ठिकाणी आहे आणि मी घटनास्थळी कर्मचारी पाठवतो असे त्यांचे म्हणणे होते हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी, मुस्लिम धर्मीय बकरीद ईद दोन सनसुदीच्या दिवशी अधिकाऱ्यांची अनुपस्थिती त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट दिसत आहे यावर महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या