💥योजनांच्या माहितीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे करण्यात आले आयोजन💥
परभणी, (दि.25 जुलै) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.29 जुलै, 2022 रोजी दुपारी 12 ते 1.30 या वेळेत संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
मार्गदर्शन सत्रास संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ मर्यादित, परभणीचे निरीक्षक बालाजी कदम हे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणार आहेत. ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.google.com/pbf-ooak-yvt या लिंकवरती क्लिक करावे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक- युवतींनी या ऑनलाईन सत्रामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
0 टिप्पण्या