💥जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळजनक💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
हिंगोली : शाळा हे विद्यार्थ्यांना घडवण्याचे एक महत्वाचे स्थान आहे. आई वडिलानंतर मुलं, मुली या शाळेच्या छताखाली असतात. शिक्षक हे त्यांना घडवण्याचाठी तत्पर असतात. मात्र, अनेकदा विद्यार्थी मानसिक तणावांमध्ये असतात. याच तणावातून घर सोडून जाणे, आत्महत्या करणे असे धक्कादायक प्रकार समोर येतात. असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील एका आदिवासी शाळेमध्ये घडला आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील आपल्या खोलीतच ओढणीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना २१ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील बोथी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिवानी सदाशिव वावधने (वय १६) ही दहाव्या वर्गात होती. १५ जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर ती वसतिगृहात वास्तव्याला गेली. इयत्ता पाचवीपासून ती तेथे शिकत होती. शिवानी मूळ गाव वारंगा येथील होती.
हॉस्टेलच्या वार्डन सविता विणकरे या २१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास वसतिगृहात नियमित तपासणी करत असताना एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार मुख्याध्यापक किशन खांडरे यांच्या कानी घातला. त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर फौजदार शिवाजी बोंडले, राठोड, शिवाजी पवार हे घटनास्थळी पोहोचले.
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे सदर मुलीचा मृतदेह पोलिसांनी तपासला असता तिच्या डाव्या हातावर ब्लेडने कापल्याच्या खुणा दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. कापलेल्या खुणा कशाच्या आहेत? याचाही शोध पोलीस घेत आहेत. अशात माझी मुलगी शासकीय निवासी आश्रम शाळेत शिकायला असताना शाळा प्रशासनाच्या ताब्यात होती. त्यांनी तिला त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच तिने आश्रम शाळेतील खोलीमध्ये गळफास घेतला असल्याचे नातेवाईकांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे करीत आहेत....
0 टिप्पण्या