💥पोलीस होण्याचे युवकाचे स्वप्न अखेर अधुरे राहिले : रनिंग करतांना मैदानावर कोसळून युवकाचा दुर्दैवी मृत्यू...!


💥हिंगोली शहरातील दुदैवी घटनेने सर्वत्र हळहळ💥

शिवशंकर निरगुडे 

हिंगोली पोलीस भरतीची तयारी करत असताना आज सकाळी हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर धावण्याचा सराव करत असताना एक युवक अचानक जागीच कोसळला त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्या युवकास मृत्यू घोषित केले. संघपाल नरवाडे ( वय २३ वर्ष ) असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा वसमत शहरातील असल्याची माहिती त्या युवकाच्या नातेवाईकांनी दिली आहे. संगपाल हा हिंगोली शहरात मागील काही दिवसापासून किरायाच्या रूम मध्ये राहत होता. मागील अनेक वर्षापासून पोलीस होण्याची स्वप्न उराशी बाळगलेल्या संगपालला पोलीस होण्यापूर्वीच काळाने घाला घातला आहे.


त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच बरोबर अचानक घडलेल्या या घटनेमुळे हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली.सध्या या प्रकरणी कुठलेही गुन्ह्याची नोंद झाली नसून संगपाल यांचा मृतदेह विच्छेदनासाठी हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलीस भरती निघेल अशीने सध्या हिंगोली च्या सर्वच मैदानावर शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी सराव करत असताना दिसून येत आहेत.सेव विच्छेदानानंतरच संगपाल यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या