💥कुरुंदा येथथील पूरग्रस्त भागात भाजपा डॉक्टर सेल आघाडीतर्फे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी....!


💥यामध्ये शेकडो रुग्णांची तपासणी करून औषध उपचार मोफत देण्यात आले💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील  वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा या ठिकाणी मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते.या ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून आता पाण्याची थोडी उसंत मिळाल्यामुळे गावातील पूर ओसरला आहे. परंतु नदीच्या पाण्यामुळे गावात जिकडे तिकडे चिखलमय वातावरन निर्माण झाले असून यामुळे विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याच दृष्टिकोनातून कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा प्रभारी डॉक्टर जयदीपराव देशमुख नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १७ जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन भाजपा डॉक्टर सेल आघाडीतर्फे करण्यात आले होते. यामध्ये शेकडो रुग्णांची तपासणी करून औषध उपचार मोफत देण्यात आले.

      भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेल आघाडीतर्फे सामाजिक बांधिलकी ची जोपासना म्हणून कुरुंदा येथे आज दिनांक १७ जुलै रोजी वैद्यकीय आघाडी भारतीय जनता पार्टी हिंगोली शाखा डॉक्टरानी पुराने जिवन उध्वस्त झालेल्या वेगवेगळ्या संसर्गजन्य रोगानी ग्रासलेल्या कुरुंदा येथील ग्रामस्थाची वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केला . या रुग्णाची तपासणी वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष व कळमनुरी विधानसभेचे प्रभारी डॉ जयदीप देशमुख ,IMA चे अध्यक्ष डॉ सचीन बगडीया, डॉ संजय नाकाडे, डॉक्टर व्यंकटेश दमकोंडवार  यानी रुग्णाची तपासणी केला. यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या