💥12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक मुलींना भोजन भत्ता 3 हजार रुपये मिळणार आहे💥
परभणी (दि.21 जुलै) : शासकिय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, टिपु सुल्तान चौक, येलदरी रोड, जिंतूर या वसतिगृहात एकुण 100 मुलींना शासन निर्णयानुसार मुस्लीम 35, बौध्द 21, पारशी 1, शीख 1, ख्रिश्चन 6, जैन 6 आणि बीगर अल्पसंख्याक 30 मुलींना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक मुलींना भोजन भत्ता 3 हजार रुपये मिळणार आहे. विद्यार्थींनींनी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन जिंतूर तथा सदस्य सचिव, अल्पसंख्याक मुलींचे शासकीय वसतीगृह, जिंतूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-
0 टिप्पण्या