💥पूर्णा शहरातील रेल्वे परिसरातल्या रस्त्यांची दुर्दैवी अवस्था : रेल्वे कर्मचारी कुटुंबासह परिसरातून वावरणाऱ्यांचा जिव फार सस्ता💥
नांदेड/पुर्णा (दि.२८ जुलै) - दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या नांदेड विभागीय कार्यालयातील महाराष्ट्र द्वेष्ट्या अधिकाऱ्यांनी पुर्णेकरांवर सुड उगवण्याचा निर्धारच केला की काय ? असा गंभीर प्रश्न सातत्याने निर्माण होत असून कधीकाळी मराठवाड्यातील सर्वात मोठे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व निजामकाळात मोठ्या व्यापारपेठेसह अत्यंत महत्वाचे मध्यवर्ती रेल्वे स्थानक असलेल्या पुर्णा रेल्वे स्थानकावरील हळुवारपणे एकेक कार्यालय नांदेडला हलवण्याचा घाट रचला गेला पुर्णेकरांच्या हक्काचे उपविभागीय रेल्वे कार्यालय देखील पुर्णेत मोठ्या प्रमाणात जमीन संपत्तीसह मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था असतांना देखील नांदेड येथे नव्याने जमीन विकत घेऊन विभागीय कार्यालयाच्या नुतन इमारतीसह विविध रेल्वे कार्यालयांची बांधकाम करून पुर्णेकरांवर सुड उगवण्याचे काम असंतुष्ट राजकीय पुढाऱ्यांनी व महाराष्ट्र द्वेष्ट्या अधिकाऱ्यांनी केले.
मागील तिन दशकापूर्वी ज्या पुर्णा रेल्वे स्थानक व परिसरात रेल्वेच्या अनेक महत्वाच्या कार्यालयांसह हजारो रेल्वे कर्मचाऱ्यांची वर्दळ दिसून येत होती त्या रेल्वे स्थानक व परिसरातील कार्यालय अक्षरशः ओस पडली सर्व परिसरातील सर्व इमारतींना भुत बंगल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे येथील क्र्यु-बुकींग लॉबीच्या स्थलांतरानंतर तर या अत्यंत महतौवाच्या रेल्वे स्थानकाची अवस्था एखाद्या किरकोळ रेल्वे स्थानकासारखी झाली यानंतर देखील सुडसत्र थांबले नसल्याचे निदर्शनास येत असून विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी येथील रेल्वे रुग्नालय,रेल्वे मराठी मिडीयम शाळा जिला शंभर वर्षे पुर्ण झाली होता त्या शाळेवर देखील वरवंटा फिरवण्याचे पाप केले.
नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी पुर्णा रेल्वे स्थानकासह परिसराच्या विकासाकडे लक्ष देणे तर सोडाच उलट विकासाच्या नावावर महत्वपूर्ण असलेले रेल्वे स्थानक ळ परिसर भकास कसे होईल यावरच जास्त भर दिल्यामुळे आता पुर्णा रेल्वे स्थानक रेल्वे परिसराला शहराशी जोडणारे रहदारीचे रस्ते परिसरातील ड्रेनेज (नाल्या) ची देखील अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयातील किंवा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुर्णेला भेट देण्यापूर्वी स्थानिक अधिकारी/कर्मचारी रस्त्यांची तात्पुरती दुरूस्ती थातुरमातूर स्वच्छता करण्याची कामे करून आर्थिक उधळण करतात परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर मात्र पुन्हा रेल्वे स्थानक व परिसराची जैसे थे...अवस्था झाल्याचे पाहावयास मिळते या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केवळ याच मुळे करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते की या पुर्णा रेल्वे स्थानक परिसराला पुन्हा पुर्वी सारखे गतवैभव प्राप्त होता कामे नयें रेल्वे परिसरातील रस्त्यांसह नाल्यांची व परिसरातील विविध कार्यालयांच्या इमारती व कर्मचारी वसाहतीतील निवासस्थानांची झालेली अवस्था रेल्वे प्रशासनाच्या निश्क्रिय व बेजवाबदार कारभाराचा प्रत्यय करून देते एवढे मात्र निश्चित.
मागील नोव्हेंबर महिण्यात रेल्वेचे जनरल मॅनेजर येणार होते यावेळी रेल्वे परिसरातील रस्त्यांची डागडुजी दि.०१ नोव्हेंबर २०२१ रोजी ०८ महिन्या पुर्वी थातुरमातूर डागडुजी करण्याचे काम केवळ दिखाव्यासाठी हाती घेण्यात आले होते परंतु जनरल मॅनेजर येऊन गेल्यानंतर मात्र ते रस्ते दुरूस्तीचे अर्धे काम तसेच सोडून देण्यात आले त्याचे पडसाद आता उमटत असुन परिसरातून जाणाऱ्या शाळेच्या वाहनांसह रुग्न वाहिण्या व अन्य वाहन पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुर्णा रेल्वे स्थानक व परिसराच्या सर्वांगीन विकासाकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे..,.....
0 टिप्पण्या