💥जनमतातून सरपंच व आठ पैकी आठ जागेवर दणदणीत विजय💥
परभणी - तालुक्यातील पाथरा ग्राम पंचायत निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या परिवर्तन ग्राम विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला असून सरपंच व आठ पैकी आठ जागेवर परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. थेट सरपंच निवडणुकीत सुभाष नारायण काकडे तर खंडू केरबा कांबळे, मंदार सुनील देशमुख, शेख रहेनाबी शेख रजा, सुनंदा भगवान लाटकर, मंचक मुंजाजी गरुड, शेख हालिमाबी शेख शिकूर भाई, सय्यद मासूमबी सय्यद अहेमद यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीचे वैशिट्य म्हणजे भाजप वगळता सर्व पक्ष एकत्र आले होते.
सर्व विजयी उमेदवाराचा सत्कार प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात घेण्यात आला या वेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शहर चिटणीस वैभव संघई, सय्यद नाझर, सय्यद अफसर, महिला आघाडी शहर चिटणीस ऍड सुवर्णाताई देशमुख, महिला आघाडी उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, सय्यद युनूस, शेख बशीर यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
0 टिप्पण्या