💥या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुनाथ बोकारे यांची प्रमुख उपस्थिती💥
पुर्णा (दि.०३ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज मंगळवार दि.०३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व शास्त्रज्ञ रॉबर्ट व्हाईटहेड यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुनाथ बोकारे, सुरेश बोकारे,सदस्य बालाजी बोकारे,नामदेव बोकारे,मारोती बोकारे, विश्वनाथ बोकारे,शिवाजी बोकारे,श्री खय्युम शेख ,श्री अंकुश बोकारे,श्री गणेश बोकारे,दिलीप रणवीर,मुख्याध्यापक गोविंद नलबलवार सर,भागवत शिंदे सर,आबनराव पारवे सर,विलास बोकारे,श्रीमती योगिता कुलकर्णी मॅडम व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता ०८ वीच्या स्वरांगी, कोमल,वैष्णवी,तेजस्विनी, मोक्षदा, मोनिका,विशाखा व कृष्णाली या विद्यार्थिनींनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आबनराव पारवे सर यांनी केले तर यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर इयत्ता ०५ वी व इयत्ता ०६ वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी विलास बोकारे सर यांनी शास्त्रज्ञ रॉबर्ट व्हाइटहेड व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.तर भागवत शिंदे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आपण जीवनात आत्मसात करावे असे स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इयत्ता ०५ वी वर्गातील विद्यार्थिनी मानसी,वैष्णवी व आरती हिने अगदी अस्खलितपणे केले.*
यावेळी अनेक विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली अध्यक्षीय समारोप गोविंद नलबलवार सर यांनी केला तर आभार प्रदर्शन इयत्ता ०५ वी वर्गातील विद्यार्थिनी समीक्षा बोकारे हिने केले.....
*💐कार्यक्रम अगदी छान प्रकारे संपन्न झाला.*
0 टिप्पण्या