🌟वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या निरोपसमारंभ कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वाटप...!


🌟दै.क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय साहित्य वाटपासह परिसरात वृक्षारोपण🌟 


पुर्णा (दि.०८ एप्रिल) - तालुक्यातील ताडकळस येथून जवळच माखणी येथे शनिवार दि.०८ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतिल वर्ग 8 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ व सौ.स्वातीताई घोडके आत्मा कृषिसहायक व दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक -धम्मपाल हानवते यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय परिसरात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष .संजय आवरगंड तर प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा कृषिसहायक स्वातीताई घोडके व दैनिक क्रांतीशस्त्रचे धम्मपाल हानवते, शिवाजी शिराळे (पत्रकार ),बाळासाहेब राऊत (पत्रकार ) देशमुख सर हे होते.यावेळेस गावातील शा.व्य.स.अध्यक्ष शिवाजी आवरगंड, माजी सरपंच  ,नेमाजी गाडे,बंडू गाडे,विष्णु आवरगंड, भगवान आवरगंड, अनुरथ आवरगंड, भगवान वाघमारे, भिमराव वाघमारे, कल्याण आवरगंड,राजेश गाडे,अदिनाथ काळे यांची उपस्थिती होती .याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी यानी आपली मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या सौ.स्वातीताई घोडके यानी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात लाज न बाळगता कोणताही व्यवसाय चिकाटीने आणि जिद्दीने केला पाहिजे यासाठी अनमोल मार्गदर्शन केले आणि त्या स्वतः ग्रामीण भागातून आणि अतिशय गरीब कुटुंबातून आज शिक्षण घेऊन या पदावर आहेत आणि आज त्याच्या कुटुंबातील सर्वच शिक्षित आणि उच्च पदावर आहेत पण आजही सर्व मोठ्या पदावर असून शेतीतील काम करण्यासाठी व कुठलेही छोटं काम करण्यासाठी लाज बाळगत नाहीत हाच अनुभव त्यांनी या शालेय विद्यार्थ्यांना सांगितला. धम्मपाल हानवते यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रगतिशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी विद्यार्थ्यांना मेहनत करून आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक संजय जोशी यांनी केले तर सुत्रसंचालन गजानन पवार यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार ढगे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज पौळ,सुनील शेळके, राम महाजन, ज्योती झटे  ,वर्ग सातवीतील विद्यार्थी व पोषण आहार मदतनीस राम आवरगंड यांनी परीश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या