🌟 यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश...!


🌟आ.धंनजयजी मुंडे,प्रदीपजी खाडे,प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांनी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन🌟

 परळी.वै (प्रतिनिधी) - येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे.

 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या  मार्च 2023 परीक्षेचा निकाल  गुरुवारी जाहीर झाला असून  या निकालात  परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 91.75 टक्के कला शाखेचा निकाल 80.48 टक्के वाणिज्य शाखेचा निकाल 75.00 टक्के इतका लागला आहे. 

या निकालात महाविद्यालयातुन

* विज्ञान शाखेतुन  :-

प्रथम ताटे मंगेश कांताराव -  77.66% ,

द्वितीय डोंगरे गायत्री भगवानराव - 76.83%,

तृतीय पाटसकर तनुजा व्यंकटेश -  75.66%

 * कला शाखेतुन :-

प्रथम किरडे वैभव कैलास -  77.00%,

द्वितीय तरटे बजरंग सूर्यकांत -  75.%,

तृतीय केंद्रे अनघा गोविंद-  73.33%,

* वाणिज्य शाखेतुन :-

प्रथम  केंद्रेआकांक्षा - 69.00%,

द्वितीय घोडके तेजश्री - 68.00%,

 तृतीय रोडे गुरु - 65.66%

महाविद्यालयातील यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.धंनजयजी मुंडे साहेब,सहसचिव प्रदीपजी खाडे,महाविद्यालयाच्या  प्राचार्य  प्रा.अतुल दुबे यांच्या सह सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या