🌟इतिहासात पुरुषांना यशाचे शिखर गाठन्यासाठी खंबीर साथ महीलांची असली तरच यशाच्या पायऱ्या चढता येतात - गोविंद आवरगंड
पुर्णा/माखणी (दि.०१ जुन २०२३) - इतिहासामध्ये पुरुषांना यशाचे शिखर गाठन्यासाठी खंबीर साथ महीलांची असली तरच यशाच्या पायऱ्या चढता येतात यांची अनेक उदाहऱणे पहायला मिळते असे प्रतिपादन पुर्णा तालुक्यातील माखणी ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद नाना आवगंड यांनी केले.
पुर्णा तालुक्यातील माखणी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली . राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या तीन पुरस्कारापैकी माखणी येथील कर्तुत्वान महिलाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या वर्षा आवरगंड प्रमुख पाहुणे सरपंच गोविंद आवरगंड, बी .आर. कांबळे ,ग्रामविकास आधिकारी राधा काळे , नेमाजी गाडे ,इंद्रजीत आवरगंड महिला ज्या गृह उद्योगातून आंबा लोणचे वाळूक उसरी तूर डाळ मूग डाळ आदी उत्पादन करणाऱ्या प्रगतीशील शेतकरी महिला मिरा आवरगंड , सुभद्रा आवरगंड, सीता आवरगंड या तीन महिलांचा सन्मान करण्यात आला.
पुढे बोलतांना प्रगतीशील शेतकरी जनार्धन आवरगंड बोलतांना म्हणतात महिलांनी उद्योग धंद्याकडे कसे वळावे व छोटे-मोठे उद्योग कसे केले पाहीजे या विषयावर मार्गदर्शन केले .ग्रामरोजगार सेवक यशवंत गाडे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या विषयावर प्रकाश टाकला कार्यक्रमाला उपस्थित महिला तारामती आवरगंड, यशोदा पल्लमपल्ली, आशा भारती, नागरबाई पल्लमपल्ली , अंगणवाडी सेविका गीतांजली आवरगंड गंगाबाई डांगे ,महानंदा भोसले नंदाबाई आवरगंड ,वंदना रोडे, देविदास पलंमपली ,मुंजा आवरगंड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गितांजली आवरगंड यांनी केले . सूत्रसंचालन ग्रामविकास आधिकारी बी. आर. कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन यशवंत गाडे यांनी मानले...
0 टिप्पण्या