🌟कुंदकेश्वर महादेव मंदिरात दि ०३ मे रोजी महादेवाच्या मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार🌟
पूर्णा (दि.०१ मे २०२३) - पुर्णा शहरातील राजेसंभाजी नगर परिसरात नुकताच जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री. कूंदकेश्वर महादेव मंदिरात बुधवार दि ०३ मे २०२३ रोजी महादेवाच्या मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
पूर्णा शहरातील राजे संभाजी नगर भागात जुने वरदायिनी हनुमान मंदिर आहे.परिसरातील रहिवाशांनी नुकताच मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे.मंदिरात कुंदकेश्वर महादेवाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.त्या निमीत्य आज मंगळवारी २ रोजी सकाळी ८ ते ११ यावेळत शहरातुन शिवलिंगाची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.११ ते ३ वेळेत विधीवत पूजा तर रात्री हभप.रामदासजी महाराज नाव्हलगांवकर यांचे किर्तन दि.३ रोजी सकाळी ८ वाजता विधीवत होम हवन,पूजा, अभिषेक शिवलिंगाची स्थापना केली जाणार असून सकाळी ११ वाजता हभप. अँड.यादव महाराज डाखोरे यांचे काल्याचे किर्तन यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीचे, अशोक कदम,जिजा कहाते,संभाप्पा धुळे, भगवान ढोणे,माधव मुळे,पिंटू नडसकर माऊली काळबांडे,संदिप कदम, बंटी एकलारे,सचिन शिंदे, गजानन क-हाळे, श्रीनिवास कदम, ज्ञानेश्वर ठाकूर रुस्तुम ढोणे सर, काशिनाथ दारकोंडे,संजय बागल, माऊली कदम, आदींनी केले आहे.....
0 टिप्पण्या