🌟पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तृत्ववान दोन महिलांचा गौरव दि.३१ मे २०२३ रोजी करण्यात येणार🌟 

परभणी (दि 22 मे २०२३) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त  महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तृत्ववान दोन महिलांचा गौरव दि.३१ मे २०२३ रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांनी महिला सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी केले आहे.

महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिला या पुरस्कारासाठी पात्र असणार आहेत. महिला व बालविकास क्षेत्रात किमान तीन वर्ष काम केलेलं असणं आवश्यक आहे. 

* असे आहे पुरस्काराचे स्वरूप :-

ग्रामपंचायत मध्ये संबंधित महिलांना गौरविण्यात येणार असून याचे स्वरूप देखील निश्चित करण्यात आले आहे यामध्ये सन्मान पत्र, सन्मान चिन्ह चाल श्रीफळ आणि रोख पाचशे रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

* अर्ज कुठे करणार :-

पुरस्कार मिळण्यासाठी महिलांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे सदरचा अर्ज तात्काळ करायचा आहे. विजेत्या महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

* गावची निवड समिती ठरवणार उत्कृष्ट महिलांची कामगिरी :-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी संबंधित गावच्या सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित करण्यात येणार आहे यामध्ये सदस्य म्हणून ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, आशाताई, अंगणवाडी ताई, यांचा समावेश असणार आहे.प्रत्येक गावांमधून दोन उत्कृष्टांत काम करणाऱ्या महिलांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या