🌟नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे,रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन...!


🌟असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले यांनी केले🌟

नांदेड (दि.31 मे 2023) :- खरीप हंगामात शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे,रासायनिक खते, किटकनाशके औषधे खरेदी करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी भाग्यश्री भोसले यांनी केले आहे.


शेतकऱ्यांनी बनावट,  भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करावेत. पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पिक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवावी.   खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन/पिशवी,  टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणाची पॉकेट सिलबंद/मोहोरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतीम मुद्दत पाहून घ्या व सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरी तपासणी करुन पेरणी करावेत. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. किटकनाशके अंतीम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोननंबर दिलेले आहेत.  अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या