🌟भाऊचा तांडा येथील टॅंक सफाई कामगारांच्या वारसांना समाजकल्यावण विभागाकडून धनादेशाचे वाटप....!


🌟जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या कार्यतत्परतेमुळे मृतांच्या वारसांना ही तात्काळ मदत पोहचू शकली🌟

परभणी (दि. १६ मे २०२३) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलतमुळे भाऊचा तांडा येथील सेप्टीेक टॅंकची सफाई करताना मृत पावलेल्या पाच सफाई कामगारांच्या वारसांना तात्काळ प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसोबतच प्रशासनातील सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या कार्यतत्परतेमुळे मृतांच्या वारसांना ही तात्काळ मदत पोहचू शकली. 

घटनेची मुख्यमंत्र्यांना ही बाब अवगत केल्यानंतर तात्काळ अनुदान मंजूर करत मृतांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य म्हणून प्रत्येकी १० लाख याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचा निधी दि. १२ मे रोजी मंजूर केला असून, त्याचा पहिला हप्ता एकूण २५ लाख रुपये तात्काळ उपलब्ध करून दिले आहेत. हे अर्थसहाय त्यांच्या वारसांना महसूल विभागामार्फत प्रत्याक्ष घरी जाऊन धनादेशाद्वारे १५ मे रोजी वितरीत करण्याचत आले. यावेळी खासदार डॉ. फौजिया खान, उपविभागीय अधिकारी दत्तुऊ शेवाळे, तहसीलदार गणेश चव्हारण व सहायक आयुक्ते, श्रीमती गीता गुठ्ठे उपस्थित होते.

शासनाच्या विविध  विभाग व समाज कल्याण विभागाच्या कार्यतत्परतेचा नवा आदर्श प्रशासनात निर्माण झाला आहे. अवघ्या काही तासातच सफाई कामगारांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य मंजूर केले आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांनी शासनाचे आभार मानले आहेत भाऊचा तांडा येथील शेतामधील सेप्टिक टॅंकची सफाई करताना पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ आहे. या अधिनियमांतर्गत महाराष्ट्र राज्यात दूषित गटारामध्ये उतरून काम करताना मृत्यू झालेल्या मॅन्युअल स्कॅवेंजर यांच्या वारसांना रुपये १० लाख रुपये नुकसान भरपाई रक्कम अदा करण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी तात्काळ समाज कल्याण विभागास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार समाज कल्याण विभागाचे सचिव श्री. भांगे, व आयुक्त डॉ. नारनवरे यांनी नुकसान भरपाई मंजूर केली आहे. औरंगाबादच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री धनकवडे यांनीही याकामी मदत केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या