🌟जिंतूर मतदारसंघातील कामास भरघोस निधी उपलब्ध करून दिला - आमदार मेघना साकोरे बोर्डीकर


🌟तब्बल 43 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न 🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

 आज दिनांक 27 मे 2023 रोजी मतदारसंघातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था लक्षात घेता आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी खालील दर्शविलेली विविध विकास कामे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च 2023 मध्ये मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला आणि आज रोजी तब्बल च्या 43 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले.

   याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्त सरकार मार्फत गोरगरीब जनतेला ज्याही योजना राबविल्या जात आहेत त्यांचा आढावा त्यांनी यावेळी आवर्जून घेतला आहे यात प्रामुख्याने श्रावण बाळ, वृद्धापकाळ,विधवा परीतक्ता,अपंग आणि घरकुल योजने संदर्भात देखील त्यांनी आढावा घेतला याप्रसंगी मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून दिले त्या विश्वासास कदापी तडा जाऊ न देता मतदार संघातील सर्व काम तत्पर होतील असा विश्वास या निमित्ताने सर्वांना दिला

 1) राममा ७५२ ते मोळा-नव्हाती तांडा - वाघी-धानोरा-हंडी या रस्त्याच्या कामासाठी १५ कोटी रुपये

2) रा.मा.२४८ ते शेवडी-भोसी-पिंपळगाव-कुऱ्हाडी-दहेगाव-वझर रस्ता प्र.जि.मा. ४ किमी च्या २० कोटी रुपये

3) राममा-७५२ चारठाणा पाटी-कु-ऱ्हाडी-करंजी-बामणी-रस्त्याच्या कामासाठीत ८ कोटी रुपये

यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, भगवान वटाणे,सुनील भोंबे, सुनील मते,कैलास खंदारे,रमेश ढवळे,रवी रणबावळे,विलासआण्णा गिते,विठ्ठल काका भगस,नारायण काचगुंडे,इंद्रजीत घाटुळ,अनिरुद्ध चव्हाण,रामभाऊ जाधव,केशव घुले,वाल्मीकी टाकरस,सुधाकर घुगे,बबन पाटील,बाबासाहेब काजळे,दत्ता काजळे,माऊली ढोणे,भगवान ठोंबरे,तुकाराम काजळे,संजय पवार,,उपअभियंता शिरसाट, शाखा अभियंता दीपक कुपटेकर, विनोद देशमुख,कंत्राटदार एस.डी.दौंडे  उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या