🌟असे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले🌟
परभणी (दि.१६ मे २०२३) : असाध्य आजारांपासून दूर स्वत:ला ठेवण्यासोबतच नागरिकांनी आपला जिल्हा तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी पुढे यावे, असे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले.
दि.३१ मे २०२३ या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त परभणी जिल्हा तंबाखूमुक्त करण्यावर त्यांनी भर दिला असून, या मोहिमेचा एक भाग म्हणून महिनाभर सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाणे, बाळगणे, विक्री करणे, थुंकणे हा तंबाखू प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा आहे. यासाठी सर्व कार्यालय, आस्थापना, खाजगी तथा सरकारी संस्था यांच्या प्रमुखांनी कार्यालय तंबाखूमुक्त ठेवून कायद्याचे पालन करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत.
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष अधिकारी व विभागीय अधिकारी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांनी संयुक्तपणे प्रमुखांची भेट घेऊन आयोजित कार्यक्रमांसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अवैध तंबाखू विक्रीस आळा घालण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून कडक कार्यवाही करण्यात येईल.
डॉ.रणवीरकर,जिल्हा सल्लागार अभिजीत संघई, केशव गव्हाणे यांनी जिल्हा रुग्णालय परिसरात कोटपा कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या १० तंबाखू सेवन करणारांवर कारवाई करत त्यांच्याकडून ७४० रुपयांचा दंड वसूल केला....
0 टिप्पण्या