🌟या प्रकरणी पक्षातील वरिष्ठांना अहवाल सादर करणार - काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव
गंगाखेड (दि.२३ मे २०२३) : गंगाखेड कृषी ऊत्पन्न बाजार समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीत फुट पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साहेबराव भोसले हे सभापतीपदी निवडले गेले आहेत. झालेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीस बहुमत प्राप्त झालेले असतानाही श्री भोसले हे स्थानिक आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पाठिंब्यावर सभापती झाले. सहकारात पक्षीय राजकारण चालत नाही, हे खरे असले तरी झालेला प्रकार चुकीचा आहे. तसेच महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या मानसीकतेला धक्का देणारा ठरला आहे. या प्रक्रियेत कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत संचालक सुशांत चौधरी यांनी श्री भोसले यांच्या बाजूने आपले मत दिले आहे. या प्रकरणाचा अहवाल जिल्हाध्यक्ष, आ. श्री. सुरेश वरपुडकर यांचेसह वरीष्ठांना सादर केला जाणार असल्याचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी सांगीतले आहे.
0 टिप्पण्या